अपहरण झालेला स्वर्णव अखेर सापडला, 10 दिवसांपासून 300 पोलीस घेत होते शोध

पुणे, 20 जानेवारी 2022: पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा काल (19 जानेवारी 2022 रोजी) दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास सापडला. गेल्या दहा दिवसांपासून पुण्यातला डूग्गू(Duggu) म्हणजेच स्वर्णव चव्हाण (Swarnav chavan) अपहरकरत्यांच्या ताब्यात होता. पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी म्हणजेच 11 जानेवारी रोजी अपहरण झालं होतं. यानंतर सर्वत्र पुणे पोलिसांचं कौतुक होत आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर स्वर्णवला शोधण्यासंदर्भातील पोस्ट व्हायरल होत होत्या. अवघ्या चार वर्षाचं पोरगं तब्बल दहा दिवसांनंतर आई-बापाच्या कुशीत परतल्यावर सगळ्या महाराष्ट्रला हेवा वाटला. यावरच सोशल मीडियावर लोक व्यक्त होत आहेत. डुग्गु पडल्यानंतर सोशल मीडियावर लोक आनंद व्यक्त करत आहेत. तर काही सेलिब्रेटिं कडून देखील यावर पोस्ट टाकण्यात आले आहेत. सिद्धार्थ जाधवने देखील पुणे पोलिसांचं कौतुक केलं आहे.

डुग्गुचा जवळपास 300 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. मात्र त्याचं अपहरण कोणी?, कशासाठी केलं होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यासंदर्भात चतुश्रृंगी पोलिसात तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलीस शोधत आहेत. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे.

कसा सापडला डुग्गु

लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीवर त्याच्या वडिलांचा नंबर होता. तेथील वॉचमन दादाराव जाधव यांच्याकडे हा मुलगा सोडून ती व्यक्ती पसार झाल्यानंतर याच इमारतीमध्ये लिफ्टचं काम करणाऱ्यांनी या बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीसही दाखल झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा