बलिया गोळीबार: आरोपींवर एनएसए व गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई केली होणार

बलिया, १८ ऑक्टोबर २०२०: बलिया गोळीबारातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंह अद्याप फरार आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गुंड कायद्यान्वये (गँगस्टर अॅक्ट) कारवाई केली जाईल. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडून देण्यासाठी पोलिसांनी बक्षीसही जाहीर केले आहे.

बलिया गोळीबार प्रकरणातील आरोपीस राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) आणि गुंड कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. १५ ऑक्टोबरला झालेल्या या घटनेत आठ जणांवर आरोप ठेवले गेले आहेत. स्थानिक भाजप नेते धीरेंद्र प्रताप सिंह यांच्यासह सहा जणांचा शोध पोलिस घेत आहेत.

त्याचवेळी याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आठ आरोपींव्यतिरिक्त २०-२५ अज्ञात आरोपींचा या प्रकरणातील एफआयआरमध्ये उल्लेख आहे. या व्यतिरिक्त डीआयजी (आजमगड रेंज) सुभाषचंद्र दुबे यांनी प्रत्येक आरोपीच्या अटकेच्या माहितीवर ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा