६० व्या राज्य नाट्य स्पर्धेला स्थगिती,स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी कलाकारांच्या खांद्यावर प्रशासनाने बंदुक तर ठेवली नाही ना?

मुंबई, 13 जानेवारी 2022: २०२१-२२ ची राज्य नाट्य स्पर्धा कोरोना च्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे.ओमिक्राॅन मुळे ६० वी राज्य नाट्य स्पर्धेला स्थगिती मिळाली.लवकरच नवीन वेळापत्रकाची घोषणा केली जाईल असे सांगण्यात आले आहे. ओमिक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारीच्या सूचनेला अनुसरून राज्यनाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी काही संघांनी ई-मेलद्वारे व दूरध्वनीवरून विनंती केली होती.

त्यामुळे येत्या १५ जानेवारी पासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.कोरोना च्या पार्श्वभूमीवर अनेक नाट्य संघांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.६० वी राज्य नाट्य स्पर्धेला स्थगिती दिल्या नंतर काही नाट्य कर्मींनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नाटककार दिग्दर्शक अशोक हंडोरे यांनी आपले मत मांडले……

सिनेमा आणि व्यावसाईक नाटके जर चालू असतील आणि सरकारची जर त्यास परवानगी असेल तर केवळ प्रायोगिक नटकांसाठी असा निर्णय घेण्या पेक्षा वेगळे पर्याय शोधता येणे शक्य होते. खरोखर ज्या संस्थेला प्रयोग करणे कोरोना मुळे शक्य नाही त्यांना पुढच्या तारखा देता आल्या असत्या . सर्वच स्पर्धकांना कमी वेळ मिळाला होता पण तरीही जिद्धीने जुळवा जुळव करून काही संस्थानी जोमने सुरवात केली त्याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही असे खेदाणे म्हणावे लागते.

सिनेमा सिरीयलचे शूटिंग व्यवस्थित चालू आहे अखंड पणे. ते कलाकार सर्व अडचणी वर मात करून कामे करताहेत .तो त्यांचा व्यवसायचा भाग असला तरीही ते काम चोख करताहेत हे नजरेआड करता येत नाही .खरं म्हणजे थिएटर सुरु करण्यासाठी कालावंतांनी सरकारवर दबाव आणला होता आणि आता स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी ही हौशी कालावंत यांचा पुढाकार आहे. पण पुढे ढकलल्या स्पर्धा पुन्हा घेण्यासाठी निकष ठरविलेले आहेत की नाहीत हे अध्याप समजलेले नाही.

पुढे ढकललेल्या स्पर्धा महिन्या दोन महिन्या साठी की वर्ष सहा महिन्यासाठी हे काही निश्चित सांगता येणार नाही. असो पुढे ढकललेली स्पर्धा पुन्हा लवकर सुरु होईल एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. या पलीकडे आपल्या हाती काही नाही.

नाटककार दिग्दर्शक सुरेश पवार यांनी देखील राज्य नाट्य स्पर्धेच्या या निर्णयावर आपले मत नोंदवले…….

सध्याचं एकूणच वातावरण पाहता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे… जान है तो जहान है हे मलाही पूर्णतः मान्य आहे.

खरं तर तुम्ही काय आणि मी काय आपण केवळ बक्षीस रकमेसाठी स्पर्धा करत नसतो.
तर मुळात आपण मेहनतीने उभारलेली आणि नंतर तितक्याच तन्मयतेने साकारणारी ही कला रसिकांच्या सेवेसाठी … त्यांची दोन घटका करमणूक करण्यासाठी… त्यांची कलात्मक भूक भागवण्यासाठी करत असतो… आणि तेच पाहायला जर समोर मायबाप प्रेक्षकच नसतील तर आपल्यालाही अपेक्षित असलेली त्या रसिकांची टाळी… त्यांची कौतुकाची थाप कलावंताला मिळणार तरी कशी?

तेव्हा अतिशय तणावात आणि घाबरत, दबकत ,दचकत व सरकारी नियम पालनाचं अत्यावश्यक ओझं घेऊन या स्पर्धेतील प्रयोग करण्यापेक्षा काही दिवसानंतर खुल्या मोकळ्या वातावरणात…सर्वच स्पर्धक संस्थांसह आणि तितक्याच खुल्या दिलाने ही स्पर्धा करणं जास्त योग्य राहील असं माझंही मत आहे.

एकंदरीत च स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या मुळे सर्वांच्याच संमिश्र प्रतिक्रिया मिळते आहे.पण या स्पर्धेच्या आयोजनाचे नियोजन या वेळी प्रशासनाने व्यवस्थित केले नसल्याचे देखील समोर आले.तसेच नाटकांच्या थिएटर पर्यंत व्यवस्थित पणे सरकारी परिपत्रक न पोहचल्या चा गोंधळ तर परीक्षक ही निश्चित न केल्याचा सावळा गोंधळ ही समोर आला आहे.कलाकारांच्या खांदयावर सरकारने बंदूक तर ठेवली नाहीना? अशी शंका येते? तर आता स्पर्धा जेव्हा सुरू होईल तेव्हा प्रशासनाने या गोष्टींवर देखील गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी;

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा