नवी दिल्ली, दि. १७ मे २०२०: चीनने हे मान्य केले आहे की त्याने कोरोना विषाणूचे प्रारंभिक नमुने नष्ट केले आहेत. अमेरिका यापूर्वीही चीनवर आरोप ठेवत आला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असा दावा केला होता की चीनने व्हायरसचे नमुने नष्ट केले आहेत. एका न्यूजवीकच्या अहवालानुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे पर्यवेक्षक लियू डेंगफेंग यांनी शुक्रवारी कबूल केले की चीनी सरकारने ३ जानेवारी रोजी अनधिकृत लॅबमधून कोरोना विषाणूचे नमुने नष्ट करण्याचा आदेश जारी केला होता.
तथापि, चीनच्या अधिकाऱ्याने त्या आरोपांचे खंडन केले ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की चीन ने काही गोष्टी लपवण्यासाठी व्हायरसच्या सुरुवातीचे नमुने नष्ट केले आहेत. लियू डेंगफेंग यांनी दावा केला की – ”प्रयोगशाळेमध्ये पुढील संभाव्य जैविक धोका टाळण्यासाठी आणि पुन्हा यासारखी कोणतीही घटना घडू नये म्हणून वायरचे हे सॅम्पल नष्ट करण्यात आले होते.”
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या अधिका्याने शुक्रवारी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत व्हायरसचे नमुने संपवल्याची माहिती दिली. लियू डेंगफेंग म्हणाले की अशा नमुन्यांची लॅब अनधिकृत होती आणि त्यांना चीनच्या आरोग्य कायद्यानुसार व्हायरस निर्मूलन करावे लागले. लियू डेंगफेंग म्हणाले की वायरस सॅम्पल नष्ट करण्याचे आदेश तेव्हा देण्यात आले जेव्हा सार्स सिओव्ही-२ या विषाणूला अतिशय रोगजन्य समजल्या जाणाऱ्या वर्ग-२ मध्ये समाविष्ट केले गेले.
अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पोम्पियो म्हणाले की, चीन ने ३ जानेवारी रोजी दिलेला आदेश म्हणजेच या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न होता. ते असेदेखील म्हणाले की, चीनने कोरोनाव्हायरस वर होत असलेल्या संशोधनामध्ये अडचणी आणण्याचा देखील प्रयत्न केला.
माईक पोम्पीओ म्हणाले होते की चीनने विषाणूवरील संशोधनावर सेन्सॉर लावून या आजाराविरूद्ध जगातील लढाईवर परिणाम घडविण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते- ‘चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने व्हायरसशी संबंधित माहिती दडपण्याचा प्रयत्न केला. हा विषाणू कोठून पसरला, त्याचा प्रसार कसा झाला आणि मानवांकडून मनुष्यांना संसर्ग कसा होत आहे, याबद्दल माहिती लपवत आहे आणि या कामात डब्ल्यूएचओ देखील लावले.
न्यूज अनकट प्रतिनिधी