अकलूजमध्ये पार पडलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण

पुणे, 5 जुलै 2022: तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे सराटी येथे निरेत स्रान झाल्यानंतर पालखी अकलूज नगरीत पोहचली. अकलुजमध्ये आज 11 वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न होणार आहे.वारकरी आणि अकलुजकर रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मैदानावर जमले होते.

तुकाराम महाराजांच्या पालखीने इंदापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर येथील कदम महाविद्यालयात डोळ्याचं पारणं फेडणारं दुसरं रिंगण पार पडलं. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण बेलवंडीत पार पडलं. यावेळी शेकडो वारकरी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. तर आज अकलूजच्या मैदानावर रिंगण सोहळा संपन्न होणार आहे.

तिसरं गोल रिंगण 5 जुलै रोजी अकलूज माने विधाल्यात होणार आहे. पहिलं उभं रिंगण 6 जुलै रोजी माळीनगर येथे तर दुसरं उभं रिंगण 8 जुलै रोजी बाजीराव विहिर येथे होणार आहे. 9 जुलै रोजी तिसरं उभं रिंगण व पादुका आरती होणार आहे. गोल रिंगणामध्ये पालखीभवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार आसतो.

दुसर्‍या घोड्यावर संत तुकाराम महाराज स्वार असतात असा वारकऱ्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणा भोवतालची माती उचलन्यासाठी वारकऱ्यांची गर्दी असते. त्यानतंर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने उड्या मारतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा