भिकारी कोरोना पसरवतोय, सुशिक्षित लोकही कमी नाहीत…..

पुणे, दि. २६ जुलै २०२०: भारतात कधी काय होईल हे सांगता येत नाही, भारतात कोरोनाचा शिरकाव आणि त्यावर भारतीयांची असणारी वागणूक ही इतर देशापेक्षा वेगळी आसल्याचे बघायला मिळते. तर इथे कधी काय घडेल याचा नेम नाही.

महाराष्ट्रात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर दरवाटकर यांनी भिकाऱ्यांमुळे कोरोना वेगाने पसरतोय, ते सोशल डिन्सटनिंग च पालन करत नाही. म्हणुन भिकाऱ्यांवर आणि भिक मागण्यावर बंदी घालावी आशी मागणी हाय कोर्टात केली. तर हायकोर्टाने त्यांना उत्तर देत केवळ भिकाऱ्यांना निशाण्यावर धरु नका शिकलेले लोक काही कमी नाहीत म्हणून सुनावले.

या प्रकारामुळे एक गोष्ट लक्षात येते, कि समाजातील माणुुसकी बद्दलची भावना हि आता कुठेतरी लृप्त होण्याच्या मार्गावर आहे. तर आत्ता पर्यंत भेटलेल्या रुग्णांनमध्ये किती भिकारी होते. ज्यांना याची लागण झाली याचे ठोस आकडे अथवा पुरावे सरकारने जनतेला दिले नसुन, महाराष्ट्रात लाॅकडाऊन मुळे अनेक भिकारी हे रस्त्यावर भुखमारीचे बळी ठरले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा