राजस्थान, २५ सप्टेंबर २०२२ : काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत G २३ अंतर्गत पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी ठरावा दरम्यान केली होती. तर काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी नकार दिला आहे, तर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस खासदार शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत.
तर अशोक गहलोत हे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीवर आहेत. तर मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून गेल्या अनेक दिवसापासून राजस्थान काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आहे. यादरम्यान आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा बालेकिल्ला असलेल जोधपुर, शहरात राजस्थानची माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थनात पोस्टर लावण्यात आले आहेत. आता जोधपुर शहरात पोस्टर वॉर सुरू आहे, तर पोस्टरवर नव्या युगाची सुरुवात असे लिहिले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या विषया वर चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिल्लीत लॉबिग करत असल्याची काँग्रेस पक्षात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे सचिन पायलट यांचे समर्थक पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजस्थानमध्ये वातावरण तयार करत असल्याचे पोस्टरबाजी मार्फत दिसून येत आहे.
काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक साठी अशोक गेहलोत यांनी आपलं मुख्यमंत्री पद सोडणार असल्याचे स्पष्ट केल आहे, एक व्यक्ती एक पद यानुसार मी मुख्यमंत्री पद सोडणार असल्याचा अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे.
अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री कोण असणार या विषयावर निर्णय घेण्यासाठी आज सायंकाळी ७ वाजता जयपूर, येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे