जोधपुर, ९ ऑगस्ट २०२०: राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. येथे देचूच्या लोदटा अचलावता गावात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व ११ जणांचे मृतदेह शेतात सापडले आहेत. सर्व मृत पाकिस्तान विस्थापित असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व लोक एकाच कुटुंबातील होते आणि अचलवता गावात काम करायचे. या प्रकरणात हत्येची शक्यता आहे.
जोधपूरच्या देचू पोलिस स्टेशन परिसरातील लोदटा गावात एकाच कुटुंबातील ११ जणांच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. जवळच्या ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ११ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. तसेच, एक तरुण जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. मृतांमध्ये २ पुरुष, ४ महिला आणि ५ मुले असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, मृत कुटुंब पाकिस्तानच्या विस्थापित भिल समुदायाचे असून काही काळापूर्वी हे सर्व लोक पाकिस्तानातून जोधपूरला आले होते. हे सर्व लोक खेड्यातील शेतात ट्यूबवेलवर काम करत असत आणि जवळच्या झोपडीत राहत असत. प्राथमिक दृष्ट्या, प्रत्येकाच्या मृत्यूचे कारण विष खाणे किंवा कीटकनाशक खाण्यामुळे आहे. मिळालेल्या माहितीवरून जोधपूर ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ एसपींसह अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी एफएसएल टीम शोध घेत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी