गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा दौंडकरवाडीतील विहिरीत शिक्रापूरच्या तरुणाचा मृतदेह

दौंडकरवाडीतील विहिरीत शिक्रापूरच्या तरुणाचा मृतदेह

शिक्रापूर, दि. १७ ऑगस्ट २०२० : शिक्रापूर रस्त्यावरील सेल पिंपळगाव नजीक दौंडकरवाडी ता. खेड गावच्या हद्दीतील एका विहिरीत एका ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. आत्महत्या की घातपात याचा शोध पोलीस घेत आहेत.

लक्ष्मण मानाजी सोनवणे (वय ४० रा, शिक्रापूर ता, शिरूर ) असे या तरुणाचे नाव आहे दौंडकरवाडीच्या महिला सरपंच शकुंतला लांडे यांचे पती वामन पोपट लांडे,( वय ५७ रा. दौंडकरवाडी ता. खेड ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लक्ष्मण हा दि. १३ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेला होता. शेलपिंपळगाव ते दौंडकरवाडी रस्त्यावर सायंकाळी सहाच्या दरम्यान लक्ष्मण सोनवणे, याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला व चाकण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version