गोल पोस्ट राष्ट्रीय आसामच्या विधानसभेच्या उपसभापतींनी प्लाझ्मा डोनरचे पाय धुवून केला सम्मान….

आसामच्या विधानसभेच्या उपसभापतींनी प्लाझ्मा डोनरचे पाय धुवून केला सम्मान….

आसाम, १७ ऑगस्ट २०२०: सध्या देशभरात कोरोना संकट चालू असले तरी आता हळू हळू सर्वांचे आयुष्य हे पुर्वपदावर येताना दिसत आहे. तर कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर अनेकजण विविध उपक्रम राबवून इतरांना प्रोत्सहन देण्याचे कार्य करत आहेत. असाच एक सम्मानांचा कार्यक्रम आसामचे विधानसभेचे उपसभापती अमीनुल हक लस्कर हे करताना दिसले.

आसामचे विधानसभेचे उपसभापती अमीनुल हक लस्कर यांनी स्वत: प्लाझ्मा डोनरचे पाय धुवून सम्मान केला. ते स्वत: कोरोना पाॅजिटिव्ह होते. तेव्हा त्यांना प्लाझ्मा देवून बरे करण्यात आले. यावरच ते म्हणाले “माझा जीव हा एका प्लाझ्मा डोनरमुळे वाचला आणि तो कोण आहे. ते मला माहित नाही पण जीव वाचवणारा देवच असतो ना, म्हणूून मी डोनरचे पाय धुवूत त्यांचा सम्मान केला.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version