नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२२: बॉम्बे हायकोर्टचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. संसदेने निर्णय ध्यायचा हा मुद्दा असल्याचे स्पष्ट करीत न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने घेतला.
या प्रकरणी याचिका करणारे मुंबईच्या कामगार न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश बी.पी. पाटील यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, न्यायालय संसदेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करु शकत नाही. घटनेतील अनुच्छेद ३२ चा दाखला देत याचिका दाखल करण्यात आली होती.
१९९५ साली बॉम्बेचे नाव बदलून मुंबई करण्यात आले होते. त्यामुळे आता बॉम्बे नावाचे शहरच अस्तित्वाच राहिलेले नाही, परंतू उच्च न्यायालय मात्र बॉम्बे नावानेच कायम आहे. २०१६ मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाचे नाव बदलून मुंबई उच्च न्यायालय करण्याचे विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते.
त्यावेळे काही कारणस्तव ते विधायक मंजूर होऊ शकले नाही.याकरीता आता बॉम्बे उच्च न्यायालयाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी आपल्या याचिकेतून करण्यात आली होती. पण ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर