सोलापूर, २० ऑक्टोबर २०२०: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी खासदार ओमराजे निंबाळकर बार्शी तालुक्यातील परिसरात गेले असता नागझरी नदीवरील छोटा पूल वाहून गेल्याचे आढळले.
बार्शी तालुक्यातील सासुरे ते कवठाळे येथील परिसरात खासदार ओमराजे निंबाळकर अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची पाहणी करण्याकरिता जात असताना त्यांना नागझरी नदीवरील छोटा पूल वाहून गेल्याचे आढळले. या पूलाचे तसेच बंधाऱ्याचे काम लघु सिंचन विभागाकडे प्रलंबित असून हे येत्या सुधारित प्रशासकीय मान्यतेत घेऊन तात्काळ करण्यात यावे, असे संबंधित अधिकाऱ्यांना कळवून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.


अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, विमा प्रतिनिधी यांनी समन्वय साधून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. एकही शेतकरी मदती पासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहील, असे निर्देश देखील खासदार ओमराजे यांनी दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड