संपत्तीच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या

नाशिक, १२ ऑगस्ट २०२०: सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीने सरकार आणि पोलिस प्रशासन ग्रासले आसताना त्यात महाराष्ट्रात गुन्हगारीचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. तर ही घटना संपत्तीच्या वादातून झाले असल्याचे कळत आहे.

संपत्तीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हि हत्या भावाने मेहुणाच्या मदतीने केली. घरासमोर दोन गाळे  असून त्याच्यावर ताबा मोठ्या भावाचाच असून वर  भाडेही भाऊच घेतो म्हणून त्यातील एका गाळ्याची मागणी करण्याचा वादातून हि हत्या झाली आहे. तर हि घटना नागपुर मधे घडली आहे.

अमीन अली सय्यद (वय ४१ वर्ष) असे मृताचे नाव असून असीफ अली सय्यद (वय ३८ वर्ष) असे हत्या करणाऱ्या छोट्या भावाचे नाव आहे. तर असीफ सय्यदने मेहुण्यांच्या मदतीने हि हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. असीफ अली सय्यद याने आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने त्याच्या भावावर धारदार शस्त्र लोखंडी रोड यांच्या सहाय्याने हल्ला केला. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. अमीन अली सय्यद यांना रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर सदर आरोपी फरार झाले होते पोलिसांनी कारवाई अंतर्गत तीन तासांच्या आत आरोपींना अटक केली.

या घटनेत एकूण चार आरोपी सहभागी होते. चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले तसेच वापरण्यात आलेली चार चाकी गाडी सेंट्रो देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा