केंद्र सरकारने केली ६,२८,९९३ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली, २९ जून २०२१: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोविडमुळे प्रभावित अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक आर्थिक घोषणा केल्या आहेत. यात काही नवीन योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर काही जुन्या योजनांचा विस्तार करण्यात आलाय. नव्या आर्थिक पॅकेजमध्ये कोविड बाधित क्षेत्रांसाठी नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी एकूण ६,२८,९९३ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोणत्या घोषणा केल्या आहेत ते जाणून घेऊया.

• कोविड मुळं परिणाम झालेल्या क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना

• आपत्कालीन पत हमी योजनेसाठी अतिरिक्त १.५ लाख कोटी रुपये

• सूक्ष्म वित्त संस्थामार्फत २५ लाख व्यक्तींना कर्ज सुलभतेसाठी पत हमी योजना

११,००० पेक्षा जास्त नोंदणीकृत पर्यटक/ गाईडस/ पर्यटन आणि टुरिझम संबंधीतांसाठी आर्थिक पाठबळ

• पहिल्या ५ लाख पर्यटकांना एक महिन्याचा मोफत पर्यटक व्हिजा

• आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ

• डीएपी आणि पोटाश खतांसाठी अतिरिक्त १४,७७५ कोटी रुपयांचे अनुदान

• प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएमजीकेएवाय) मुदतवाढ- मे ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य

• सार्वजनिक आरोग्यासाठी आणखी २३,२२० कोटी रुपये, बालके सुश्रुषा/ बालकांसाठीच्या खाटा यावर भर

• ईशान्य प्रदेश कृषी विपणन महामंडळांचे (एनईआरएएमएसी) ७७.४५ कोटी रुपयांच्या पॅकेज द्वारे पुनरुज्जीवन

• नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाउंट द्वारे प्रोजेक्ट एक्स्पोर्टसाठी ३३,००० कोटी रुपयांची चालना

• एक्स्पोर्ट इन्शुरन्स कव्हरसाठी ८८,००० कोटी रुपये

• भारत नेट पीपीपी मॉडेल द्वारे प्रत्येक गावासाठी ब्रॉडबॅंड करिता १०,०४१ कोटी रुपये

• मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोनिक उत्पादनासाठी पीएलआय योजनेला २०२५-२६ पर्यंत मुदतवाढ

• सुधारणा आधारित फलनिष्पत्तीशी निगडीत वीज वितरण योजनेसाठी ३.०३ लाख कोटी

• पीपीपी प्रकल्पांसाठी आणि मालमत्तेतून महसूल मिळवण्यासाठी नवी सुटसुटीत प्रक्रिया

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा