मुख्यमंत्री रात्री ८ वाजता जनतेशी साधणार संवाद

10

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यातील विविध प्रश्नांबाबत ही मुख्यमंत्री या उत्तर देतात याकडे ही लक्ष असेल.

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, मंदिरातील गर्दी, शाळा पुन्हा सुरु करणे, वाढीव वीजबिलावर सवलत, लॉकडाऊन यांसह अनेक विषयांवर उद्धव ठाकरे भाष्य करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या विषयी बोलणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

लॉकडाऊन दरम्यान लोकांना आलेल्या वाढीव वीजबिलांवरुव विरोधक टीका करत आहेत. जर राज्यातील जनता ही नाराज आहे. मनसेनं सरकारला इशारा दिला आहे. तसेच मोर्चा देखील काढणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे