गलवान खोऱ्यापासून चीनी सैन्य एक किमी अंतर सरकले मागे

4

नवी दिल्ली, दि. ६ जुलै २०२० : मे महिन्यापासून भारत आणि चीनमधील वादात आता मोठी बातमी समोर आली आहे. १५ जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते, आता तेथून चिनी सैन्य सुमारे एक किमी अंतरावर माघारी गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लष्करामध्ये चर्चेच्या फेर्‍या चालू आहेत. या चर्चेमध्ये गलवान खोऱ्यामधील सैन्य मागे घेण्याबाबत जास्त जोर दिला जात होता. चिनी सैन्याने घेतलेली ही माघार या चर्चासत्रातील पहिली यशस्वी घटना मानली जात आहे.

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी), चीनी सैन्य गलवान व्हॅलीमधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे एक किमी अंतर मागे सरकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही सैन्यांमध्ये समंजस स्थापन झाले आहे व विवादित स्थानापासून दोन्ही सैन्य मागे सरकण्यासाठी तयार झाले. १५ जून रोजी गलवान खोऱ्यामध्ये ज्याप्रकारे हिंसक चकमक झाली त्याची दक्षता घेत आता गलवान खो-या लगतच्या भागामध्ये बफरिंग झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या भागांमध्ये पुन्हा १५ जून सारखी घटना होणे टाळता येणार आहे.

चिनी सैन्याने आपले तंबू, गाड्या आणि सैनिक मागे घेण्यास सुरवात केली आहे. कॉर्प्स कमांडर लेव्हलच्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सुमारे एक किमी अंतर सीमेपासून मागे सरकले आहेत. जे भारतीय बाजूने पाहिले जाऊ शकते. तथापि, चीनने आपले सामान सीमेपासून काही अंतरावर ठेवलेले आहे. याबाबत देखील सैन्यांमध्ये चर्चा होऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा