फुजियान, 15 सप्टेंबर 2021: चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा होताना दिसत आहे. यामुळे चक्क चीन मधील एक शहर पूर्ण सील करण्यात आले आहे. चीनच्या आग्नेय प्रांतातील फुजियानमधील एका शहरात सिनेमा, जिम आणि महामार्ग बंद करण्यात आले आहेत. येथील रहिवाशांना शहर सोडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर कोरोना संसर्ग पुन्हा दिसल्यानंतर चीनच्या या शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सोमवारी स्थानिक प्रसारमाध्यमांनी असे वृत्त दिले की, फुजियान केपुटियन शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आणि गुंतागुंतीची आहे आणि हे शक्य आहे की येथे कोरोना संक्रमणाची अधिक प्रकरणे आढळतील. पुतिया शहराची लोकसंख्या 3.2 मिलियन आहे. येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने तज्ज्ञांचे पथक पाठवले आहे.
येथील काही शाळांमध्ये ऑफलाईन अभ्यास देखील बंद करण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान फुजियामध्ये कोरोनाचे 43 नवे रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 35 पुतियनमध्ये सापडले आहेत. याशिवाय, 10 सप्टेंबरपासून पुतियनमध्ये 32 लक्षणे नसलेली प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत. चीन लक्षणे नसलेली म्हणजेच संक्रमित लोकांना ताप आणि इतर क्लिनिकल लक्षणे नाहीत अशी प्रकरणे पुष्टीकृत प्रकरणे म्हणून मोजत नाही.
12 सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण 95,248 कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली तर 4,636 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा उद्रेक शेवटचा चीनमध्ये जियांगसूमध्ये दिसला जो नुकताच दोन आठवड्यांपूर्वी संपला. आता इथे नवीन प्रकरणे नाहीत. शेवटच्या कोरोना आउट ब्रेकचा कहर जियांगसूमध्ये महिनाभर चालू राहिला. स्थानिक आरोग्य अधिकारी म्हणतात की पुतियनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांच्या तपासात असे आढळून आले आहे की हे लोक वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकाराच्या संसर्गाला बळी पडले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे