लातूर शहर लवकरच होणार कचरा मुक्त

लातूर, १९ नोव्हेंबर २०२० : लातूर शहरातल्या नागरिकांकडून घरोघरी जाऊन संकलित केलेला कचरा एकत्रित करून तो डेपोवर पाठविण्यासाठी उभारण्यात आलेले शहरातील ९ रॅम्प बंद करण्यात आले. कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पालिकेने हा निर्णय घेतला असून आता केवळ दोन रॅम्पवर कचरा एकत्र करण्याचे काम सुरू आहे.

लवकरच हे भाग ही कचरा मुक्त होणार आहेत. मागील ३ वर्षापासून सुरू असलेले रॅम्प बंद केल्यामुळे शहराच्या विविध भागातील नागरिकांना यापुढे कचरा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नसल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा