मुंबई, 19 जानेवारी 2022: मुकेश अंबानींच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने नवीन करारात रोबोटिक्स स्टार्टअप Addverb Technologies मधील 54 टक्के हिस्सा विकत घेतलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल युनिट रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड मार्फत हा करार करण्यात आला आहे. रिलायन्स रिटेलने हा करार $132 दशलक्ष म्हणजेच 985 कोटी रुपयांना केला.
एडवर्ब आखत आहे एक मोठा प्लांट उभारण्याची योजना
स्टार्टअप अॅडव्हर्ब टेक्नोलॉजीजने स्वतः या डीलबद्दल माहिती दिली. स्टार्टअप कंपनीने सांगितलं की, या करारामुळं अमेरिका आणि युरोपमधील बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत होणार आहे. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मिळालेल्या पैशातून त्याच ठिकाणी मोठा रोबोटिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी संसाधनेही मिळतील.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डील मदत करेल
संगीत कुमार, CEO आणि सह-संस्थापक, Addverb Technologies, म्हणाले की, त्यांच्या कंपनीला या कराराचा खूप फायदा होणार आहे. यासह, स्टार्टअप कंपनी विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोबोट तैनात करण्यास सक्षम असेल. रुग्णालयं आणि विमानतळांवर रोबोट तैनात करण्याच्या योजनेवर कंपनी काम करत आहे. या करारामुळं त्याला वेग येण्याची शक्यता आहे.
सध्या कंपनी दरवर्षी 10 हजार रोबोट बनवत आहे
या करारामुळं एडवर्बचं मूल्य 265 ते 270 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2000 कोटी रुपये) पर्यंत पोहोचलं आहे. कंपनी सध्या आपल्या नोएडा प्लांटमध्ये दरवर्षी सुमारे 10 हजार रोबोट बनवत आहे. एडवर्ब आधीच रिलायन्स रिटेलला उपाय देत आहे. आता या डीलनंतर अॅडव्हर्बचा स्टेक रिलायन्स रिटेलकडं आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे