चीनच्या प्रयोगशाळेतच बनला कोरोनाविषाणू, नव्या संशोधनात दावा

युके, १ जून २०२१: कोरोना विषाणूचा उगम कसा झाला? जग या प्रश्नाचं उत्तर शोधतंय. आता एका नव्या संशोधनात असं म्हटलंय की कोरोना व्हायरस चीन मधील वुहान शहरातील त्याच प्रयोगशाळेत बनवला गेलाय ज्यावर पूर्ण जगाचं लक्ष आहे. ताज्या अभ्यासानुसार, कोरोना विषाणू तयार होताना, रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या आधारे, हा विषाणू एखाद्या वटवाघुळा पासून निर्माण झाला असल्याचं दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला.

डेलीमेल यूकेच्या वृत्तानुसार, ब्रिटिश प्रोफेसर अँग्युस आणि नॉर्वेचे वैज्ञानिक डॉ. बर्गर यांना अभ्यासात असं आढळून आलं की कोरोना लपवण्यासाठी चीननं रेट्रो इंजिनिअरिंगचे कागदपत्र तयार केले आणि जगाला मूर्ख बनवलं. अभ्यासात असं म्हटलंय की, गेल्या वर्षी कोरोना विषाणूविरूद्ध लस बनवताना शास्त्रज्ञांना काही धागेदोरे हाती लागले. ज्यानं सूचित केलं की व्हायरस लॅबमधून आलाय. वैज्ञानिक त्याच वेळी याविषयी माहिती प्रसिद्ध करणार होते, परंतु बऱ्याच मोठ्या संस्थांनी नकार दिला आणि वटवाघळा विषयीचा सिद्धांत खरा मानण्यात आला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश

आता, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडेन कोरोनाची उत्पत्ती कशी झाली याच्या तपासणीबद्दल जाहीरपणे बोलत आहेत, तेव्हा जगातील अनेक देश याकडं लक्ष देताना दिसतायत. जो बाईडन यांचं हे वक्तव्य तेव्हा आलं जेव्हा व्हाइट हाउस ला दिल्या गेलेल्या एका इंटेलिजन्स रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला होता की, सप्टेंबर २०१९ मध्ये वुहान लॅब मधील काही कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, या कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची लक्षणं होती. याच्या काही काळानंतरच कोरोना महामारीनं संपूर्ण जगाला हादरून सोडलं.

एवढंच नाही तर अमेरिकेतील काही आरोग्य अधिकारीदेखील या वेळी निशाण्यावर आहेत, कारण वुहानमधील संशोधनासाठी काही गुंतवणूक त्यांच्या वतीनेही केल्याचं निष्पन्न झालंय. परंतु यादरम्यान, नुकत्याच झालेल्या संशोधनात असं स्पष्टपणे सांगितलं गेलंय की हा व्हायरस नैसर्गिक रित्या उद्भवलेला नाही तर याचा जन्म प्रयोगशाळेतच झाला होता.

वुहान लॅबचा पूर्ण पर्दाफाश करण्याचा दावा

हा संशोधन अहवाल पूर्ण २२ पानांचा आहे, ज्यामध्ये वुहान लॅबची संपूर्ण कुंडली आहे. दाव्यानुसार, वुहान लॅबमध्ये २००२ ते २०१९ दरम्यान जे घडलं त्याचा संपूर्ण अभ्यास या अहवालात तयार केला गेलाय, ज्यामुळं कोरोना विषाणूबद्दल मोठा खुलासा होऊ शकंल. महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणू जगासमोर आला, तेव्हापासून या महामारीनं पूर्ण जगाला त्रस्त करून सोडलंय. लाखो लोक मरण पावले आहेत आणि लाखो अजूनही संक्रमित होत आहेत. जगानं वुहानच्या मागं चीनचा हात असल्याचा बऱ्याचदा सांगितलंय, परंतु चीन प्रत्येक वेळी त्यास नकार देत आलाय. डब्ल्यूएचओनंही कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भात चौकशी सुरू केली होती, परंतु चीनमध्ये गेलेल्या टीम ला तेथे कोणतंही सहकार्य मिळालं नाही, म्हणूनच या तपासावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहिली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा