उल्हासनगरमधील फेरीवाल्यांना महानगरपालिका देणार १०,००० रुपये व्यवसाय भांडवल

उल्हासनगर, दि. ३० ऑगस्ट २०२०: उल्हासनरमधील सर्व फेरीवाले तसेच हातगाडी वाल्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे कार्य मागील वर्षीच सुरू झाले होते. तसेच केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार उल्हासनगर महानगरपालिका पंतप्रधान राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत १ सप्टेंबर २०१९ पासून फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते.

ज्यामध्ये जियो मेप्पिंगद्वारे फेरीवाल्यांच्या व्यवसायाच्या जागी जाऊन निःशुल्क नोंदणी करण्यात आली होती. तसेच हे कार्य २०१९ पासून सुरु होते, ज्यामध्ये फेरीवाले तसेच हातगाडी चालकांची नोंदणी करण्यात आली होती. राज्य आणि केंद्र शासन योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका पंतप्रधान राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत उल्हासनगर मधील फेरीवाल्यांना १०,००० रुपये व्ययवसाय भांडवल शासनातर्फे देण्यात येईल अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिकेने एका जाहिरातीत दिली आहे.

तसेच पंतप्रधान राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना आत्मनिर्भर  बनवण्यासाठी प्रत्येकी  १०,००० रुपये मंजूर केले जाणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा