दिल्ली, १ फेब्रुवारी २०२३ : आज बुधवार (१ फेब्रुवारी २०२३) अर्थमंत्री निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करीत आहेत. या अर्थसंकल्पाकडून मुंबई आणि महाराष्ट्राच्या अपेक्षांबाबत आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलविण्यात आले आहेत. इंटरनॅशनल फायनान्स सेंटरसारखा प्रकल्प अहमदाबादला गेला. मुंबई अनेक गरीब राज्यांचे पोट भरते. मुंबईत अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. त्याची भरपाई होईल, अशी आशा आहे. संजय राऊत यांनी सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक आणि बँकांची बुडीत कर्जे यांचाही समाचार घेतला.
देशाची लूट होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. या लुटीत मुंबईचाही पैसा आहे. निवडणुकीच्या बीएमसी पार्श्वभूमीवर पीएम मोदी पुन्हा पुन्हा मुंबईला भेट देत आहेत. महाविकास आघाडीने सुरू केलेल्या कामांचे उद्घाटन करताना महिनाभरात दुसऱ्यांदा मुंबईत येत आहे. त्यांचे टार्गेट बीएमसी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ निवडणुकीसाठी मुंबईत येऊ नका अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राला काहीतरी मिळेल, हीच अपेक्षा. असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने संपादकीयमध्ये लिहिले आहे की, ‘गेल्या पाच वर्षांत देशातील अनेक व्यापारी, उद्योगपतींनी करोडो रुपयांचे कर्ज बुडविले आहे. बँकेकडून कर्ज घेऊन ही टोळी गायब झाली आहे. मोदी, चोक्सी, मल्ल्या अशी मोजकीच नावे समोर आली आहेत, तर शेकडो बुडविणारे आहेत. गेल्यावर्षी सरकारने राज्यसभेत देशातील बँकांचे सुमारे १० लाख कोटींचे थकीत कर्ज राईट ऑफ केल्याची माहिती दिली होती. आता खटला चालला तरी कोट्यवधी रुपयांची वसुली अशक्यच दिसते. तरीही विकास आणि स्वावलंबनाचा ढोल पिटला जात आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड