चाकण येथून निघालेले जोडपे म्हणतंय हातगाडीवरून चाललो आमच्या गावा….

पुणे, दि.१८ मे २०२०: संपूर्ण राज्यात सध्या लॉक डाऊन आहे. अनेक मजूर, कामगार आपल्या गावाकडे जाण्यासाठी मिळेल त्या साधनांचा उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या परिस्थितीत चाकण येथून एक जोडपे आपली हातगाडी घेऊन आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन आपल्या गावाकडे परभणीकडे निघाले, हे कुटुंबाने नऊ दिवसांच्या प्रवासानंतर आज बीडमध्ये प्रवेश केला आहे. मात्र प्रशासनाने कोणत्याही वाहनाची मदत केली नाही.अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याबाबत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितले की, आम्ही नऊ दिवसांपूर्वी चाकण ( ता.खेड) येथून आमच्या हातगाडीवर गावी निघालो होतो. अनेक संकटांचा सामना करत आज बीडमध्ये सुखरूप पोहचल्याचा आनंद आम्हाला आहे.
ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत आम्ही आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. अजून आम्हाला परभणी गाठायची आहे. आमच्यासोबत एक
हातगाडी, एक लहान मुलगा आहे. आम्ही दोन जोडपीे प्रवास करत असून आम्ही परभणी येथे जाणार आहोत. दुसरे जोडपे अंबाजोगाई तालुक्यातील पुसद येथे जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

आतापर्यंतच्या प्रवासात अनेक ठिकाणी लोकांनी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली. कोणी भोजनाची व्यवस्था केली तर कोणी आर्थिक सहकार्य केले. पोलिसांचीही काही वेळा मदत मिळाली. मात्र, यांची अद्यापही थर्मल तपासणी झाली नाही.

लोकांची मदत मिळते, प्रशासन मात्र या परिस्थितीवर गप्प आहे. कामगार मजुरांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी प्रशासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याची खंत या नागरिकांनी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा