राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२०: राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात काल ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, काल राज्यात नव्याने ५,२४६ करोनाचे रुग्ण आढळून आले. तर ११७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाच्या ५० हजार २०९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात सध्या ८३ लाख ६४ हजार ०८६ कोरोनाग्रस्त आहेत. गेल्या २४ तासांत ७०४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २४ हजार ३१५ जणांचा बळी गेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा