निसर्ग चक्रीवादळानें मुंबईला भले तडाखा दिला नाही पण रायगड जिल्हाला मोठा फटका बसला आहे. या मधे घरे, झाडे, बागांचे नुकसान तर झालेच पण त्या बरोबर सर्वात मोठी हानी हि महावितरणाच्या विद्युत पुरवठ्यावर झाली.
निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका हा महावितरणाला बसला, जागो जागी खांब, तारा निखळून पडले होते. ज्या मुळे ठाणे, वाशी, पेण मधील जवळपास ७.८० लाख कुंटुबे ४८ तासापेक्षा जास्त वेळ विनाविजेचे आहेत. तर महावितरणचे आठ तालुक्यातील १७०० गावांतील जाळे उद्वस्त झाले. चक्रीवादळाने काय नुकसान केले याची प्रचिती आता रायगडकरांना येत आहे. रायगड जिल्ह्यासाठी पेण हे महावितरण कार्यरत आहे. या मंडळांतर्गत आलिबाग, मुरुड, तळा, श्रीवर्धन, गोरेगाव, माणगाव तालुक्यात विजेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. रायगडच नव्हे तर ठाणे जिल्हात देखील १ लाखापेक्षा जास्त कुंटुबांना विजेच्या स्वरुपात चक्रीवादळाचा फटका बसला. तर रायगड ठाण्यासह अनेक भागात बुधवारपासून वीज नाही. चक्रीवादळाने जिल्हांचे भीषण नुकसान केले त्यात वीज गेल्यानें अनेक नागरीक त्रस्त झाले आहेत.
या निसर्ग चक्रीवादळाच्या महाविरण्यावर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आलिबाग मुरूड व श्रीवर्धनचा दौरा केला. महावितरणाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या नुकसाना बद्दलची चर्चा करण्यात आली व आडथळे येत आसतील तर एनडीआरएफ च्या मदतीने ते काम पुर्ण करण्याचे स्पष्ट सूचना दिल्या, तर युद्धपातळीवर महावितरणाचे काम चालू आहे.