राज्यात पोलिसांची भरती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई, १७ सप्टेंबर २०२० : राज्यात साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बळकट होण्याबरोबरच राज्यातल्या तरुणांना रोजगारासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं.
या अंतर्गत पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदं १०० टक्के भरली जाणार आहेत. पदभरतीसाठी वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
याबरोबरच राज्यात कृषि महोत्सव योजना राबवायला मंजुरी देण्यात आली असून  दिवंगत बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवायचा तसंच अंबड इथं जिल्हा आणि तालुका न्यायालय स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा