पटना, १३ नोव्हेंबर २०२०: बिहारमधे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमतानं निवडून आलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ता कधी स्थापन करणार याबाबतचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. येत्या १५ नोव्हेंबरला रालोआच्या घटक पक्षातल्या निवडून आलेल्या सदस्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत संभाव्य सरकारच्या संरचनेबद्दल चर्चा होईल आणि मगच निर्णय घेतला जाईल असं बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी सांगितलं आहे.
रोलाआतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची पाटणा इथं बैठक झाली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. निवडणूक निकालानंतर ही पहिलीच बैठक होती. मावळत्या सरकारच्या मंत्रीमंडळाची शेवटची बैठक आजच दुपारी होईल. या बैठकीत विद्यमान विधानसभा विसर्जित करण्याबद्दल शिफारस केली जाणार आहे, अशी माहितीही नितिश कुमार यांनी दिली.
दरम्यान या निवडणूकीत जिंकलेले एकमेव अपक्ष आमदार सुमीत सिंग यांनी नितिश कुमार यांची भेट घेऊन रालोआला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी