बारामती, १५ डिसेंबर २०२०: बी एस सी (कृषी) साठी प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत १९ डिसेंबर असुन यावेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी पदवीधर युवा संघटना ‘हेल्प डेस्कच्या’ माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्रिय झाली आहे. असं शुभम गाडेकर यांनी सांगितलं.
बी एस सी ( कृषी) प्रवेशासाठी दि.१९ डिसेंबर अंतिम तारीख असुन प्रवेशावेळी विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी मध्ये मदत करण्यासाठी कृषी पदवीधर युवा संघटनेकडून ‘हेल्फ डेस्क’ ची संकल्पना राबवली आहे. संपुर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात हेल्प डेस्क संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश घेण्यापर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी किंवा कागदपत्र पडताळणी मध्ये बऱ्याच अडचणी येतात, त्यावेळी हेल्प डेस्क विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शुभम गाडेकर व स्वप्नील चांदगुडे यांनी सांगितलं.
बी एस सी ( कृषी) प्रवेशाच्या प्रक्रियेत काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असं विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे. प्रवीण गवारी – ९६०४१४३०९०, वैष्णवी सपकाळ -८६६८४३०२६६, शिवम भोसले – ७३८७१८४४९९, अभय साळुंके – ८८३०९०५०६०, श्रीधर दिवेकर ७०५८७५७७७८
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव