बारामती, २३ ऑगस्ट २०२०: बारामती शहरातील वयस्कर नागरिकाला कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने शहरातील हॉस्पिटलने इलाज करण्यास नकार दिला असताना, आरोग्य हॉस्पिटलचे डॉ. राहुल जाधव यांनी परिस्थिचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य पद्धतीने कोविड उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने योग्य इलाज करत रुग्णाला जीवदान दिले.
बारामती शहरात सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी कोविड तपासणी करण्यास सांगत आहेत. बारामती तांबोळी नामक रुग्णाला ताप, सर्दी,खोकल्याचा त्रास होत असल्याने कसब्यातील खाजगी डॉक्टरांकडे इलाजासाठी नेल्यावर त्यांच्या छातीचा एक्सरे काढण्यावर निमोनियचे लक्षणे निदर्शनास आली. तांबोळी यांना कोविड सेंटर मध्ये दाखल करुन कोविड टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट निगेटीव्ह आली मात्र निमोनिया जास्त प्रमाणात असल्याने त्यांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर असणाऱ्या दवाखाण्यात पुढील उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. कोरोना सारख्या बिकट प्रसंगात आरोग्य हॉस्पिटलचे डॉ जाधव यांनी उपचार सुरू केले.
मात्र निमोनियचे प्रमाण जास्त असल्याने रुग्णाची सर्व लक्षणे कोविडची होती. डॉ. जाधव यांनी योग्य इलाज करत लागणारे इंजेक्शन शासनाच्या सर्व नियमांप्रमाणे कागदाची पूर्तता करत माणुसकी जपत गरजेच्या काही मशीन देखील नवीन विकत घेतल्या. एखाद्या रुग्णप्रति आत्मीयता दाखवली. वैद्यकीय निष्ठा दाखवत रुग्ण घरी चालत आला असा आनंद कुटुंबातील व्यक्तींनी व्यक्त केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: