इंदापूर, ५ ऑक्टोबर २०२० : इंदापूर तालुक्यातील सराफवाडी गावच्या हद्दीत असणारा पुरातन वाघाळे तलाव दुरुस्ती करण्यासाठी,गावातील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार सर्व माहिती आमदार रोहित पवार यांना आम्ही कळवली.गावाची शेतकऱ्यांची नस ओळखून तलावाचे काम करण्यासाठी मशीन खोदाईसाठी निधी लगेच उपलब्ध करून दिला,त्यामुळे वाघाळा तलावाचे काम करता आले अशी माहिती बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दिली.
बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते हे पार पडले.यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक किरण बोरा, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष छाया पडसळकर,सराफवाडी गावचे सरपंच सुखदेव बाबर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप माने,विष्णू सूर्यवंशी,दत्तात्रेय बाबर,शब्बीर शेख,चांगदेव सूर्यवंशी,निलेश जाधव,भिमराव लोंढे, हनुमंत लांवड,लव्हू भापकर,राजु बावकर,गावचे ग्रामसेवक सचिन पवार,दादाराम जाधव,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते


पुढे बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या की,सराफवाडी गावात पहिल्यांदा तीन वर्षापूर्वी आले होते.या गावाचा महत्त्वाचा विषय होता ते म्हणजे पाणी, त्यामुळे येथील पुरातन असणारा वाघाळे तलाव या तलावाच्या माध्यमातूनच पाच गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न अवलंबून होता.पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे,मी तात्काळ आमदार रोहित पवार यांना फोन केला व तात्काळ पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी रोहित पवार यांनी या तलावाच्या खोद कामासाठी मदत केेली.तसेच जवळपास २५ गावांमध्ये या मदतीच्या जोरावर कोट्यवधी लिटर पाणी आज साठवता आले आहे.
बारामती येथील आमची संस्था एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाले आहे. काम करताना खूप मजा आली,गावांमध्ये एवढे – तेवढे हेवेदावे होते.मात्र हे काम पूर्ण झाले.गावाच्या पाण्यासाठी कष्ट करणारा,श्रमदान करणा-या मधूनच गावाला शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करणं हे काम या गावकऱ्यांनी केल्यामुळे,पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यात दुसरा क्रमांक सराफवाडी गावाने मिळवला आहे,याचा मला अभिमान वाटतो.
पाणी हे जीवनत खूप महत्त्वाचे आहे.जरी आता खुप असले तरी ते वापरले पाहिजे.या वर्षी भरपूर पाऊस पडला असला तरी देखील पुढल्या वर्षी पाऊस येईल अशी शक्यता नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती ठिबक द्वारे सिंचित करावी.अतिरिक्त पाण्याचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होतो.हे शेतकऱ्यांनी ओळखले पाहिजे व पाण्याचा वापर कमी करून अद्ययावत शेती करण्यावर भर दिला पाहिजे.असे आव्हान देखील सुनंदाताई पवार यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापुराव जाधव यांनी केले.
प्रतिनिधी निखिल कणसे.