चीनच्या कुरापती

नवी दिल्ली,२१ जानेवारी २०२२;चीन हा बलाढ्य देश म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी चीन हा भारताला आधीपासूनच डोकेदुखी बनला आहे. कोरोना हा आजार चीनने भारतात पाठवला, अस मत सगळीकडून व्यक्त होत आहेत. हे जरी चीनला मान्य नसले तरी देखील आपण कमी नाहीच, हे चीन कायम काही ना काही कुरापतींमधून दाखवत आहे. यांचे उदाहरण म्हणजे, नुकतेच भारतीय तरुणाचे चीनने केलेले अपहरण. अरुणाचल प्रदेशातल्या मिराम तारोन या तरुणाचे चीनी सैन्याने अपहरण केले असे अरुणाचल प्रदेशाचे खासदार तापिर गाओ यांनी म्हंटले आहे.

या तरुणाचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी भारतीय लष्कराने चीनच्या सैन्याकडे अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मीकडे मागणी केली आहे . तसेत प्रचलित शिष्टाचारानुसार त्याला भारतीय सैन्याकडे , भारतीय सीमेत धाडावे, असेही लष्कराने म्हंटले आहे. असे सांगण्यात आले आहे की, हा तरुण औषधी वनस्पती शोधण्यासाठी आणि शिकारीसाठी गेला असताना रस्ता चुकला आणि चीनच्या हद्दीत शिरला.

नंतर त्याचा ठिकाणा सापडला नाही. मात्र चीनने अशा कुठल्याही तरुणाविषयी माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहे. यावर विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर अशा तरुणाचे गायब होणे, नक्कीच धोकादायक आहे. आमचा पक्ष त्या कुटूंबियांच्या पाठीशी उभा आहे. पण पंतप्रधान याबाबतीत मौन बाळगून असून त्यांना काहीही फरक पडत नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

वास्तवात नक्की काय घडले, तो तरुण कुठे गायब झाला याची नक्की माहिती कुणालाच नाही. पण यावरुन आता पुन्हा राजकारण पेटणार हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा