गुजरात निवडणुकांची धामधूम सुरु

4

गुजरात, ३ नोव्हेंबर, २०२२ : गुजरात निवडणुकांचे बिगुल वाजलं. अखेर एक आणि पाच डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुका होणार असून, त्याचा निकाल आठ डिसेंबरला लागणार आहे. हे मतदान दोन पर्वात होणार असून १८२ जागांसाठी हे मतदान होणार आहे. त्यात पहिल्या पर्वात ८९ तर दुस-या पर्वात ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण ४.९ करोड लोक हे मतदान करतील, असा गुजरात सरकारचा अंदाज आहे.

या मतदानाची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी गुजरात सरकारने मोरबी पूल अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, साधारणपणे १६० जागांवर मतदानाचे पोल तयार करण्यात येणार आहे. जेणेकरुन कोणालाच अडथळा येणार नाही. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन पार्टींमध्ये लढत होणार आहे.

मागच्या निवडणुकीत भाजपने ९९, काँग्रेसने ७७ जागांवर बाजी मारली होती. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहेच. त्यातच पंतप्रधान मोदींचा तिथे गेल्या दोन दशकांपासून ऑरा पसरलेला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही नक्कीच चुरशीची होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिना हा गुजरातसाठी करो या मरो या पर्वाखाली येणार हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा