पुणे २१ जून २०२३: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असुन पावसाळ्याला सुरुवात होऊन देखील पावसाची चिन्हे नाहीत. या भागातील विहिरी, कूपनलिका, तलाव, नदयांनी देखील आता तळ गाठल्याने पिकांना पाण्याचा ताण बसू लागला आहे. शेतकरी आता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात दररोजच निरभ्र आकाश, कडक-ऊन सावली व सोसाट्याच्या वारा सुटत आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी देखील पावसाची चिन्हे आकाशात दिसत नसल्यामुळे या परिसरात आता पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागलीय. सर्वच जलसाठ्यांनी आता तळ गाठला आहे. गावेगावाच्या नळ पाणीपुरवठा योजना देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
दुसरीकडे शेतकऱ्यांनी मशागत करून त्यामध्ये शेणखत कोंबडी खत पसरवून पेरणीची तयारी केली आहे. या भागात पावसाच्या आशेवर आडसाली ऊस लागवडी देखील शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत. परंतु पावसाची शक्यता दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर