मागील वर्षातील कांडे बिलाचे पाचशे रुपये कारखान्याने तात्काळ शेतकऱ्यांना द्यावे

माळेगाव, २७ ऑक्टोबर २०२०: शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असेल तर सभासदांना कांडे बिलाचे ५०० रुपये तात्काळ द्यावेत असे निवेदन सोमवार दि. २६ रोजी बारामती शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव बुरुंगुले यांनी माळेगाव साखर करखान्याला दिले आहे.

माळेगाव साखर कारखाण्याने सालाबादप्रमाणे उसाचे कांडे बील जून महिन्याच्या अखेरीस दिले जाते. याचा उपयोग सभासदांना मुलांच्या शिक्षणासाठी तसेच नविन उसाची लागण करण्यासाठी आपण दरवर्षी कांडे बिल कारखाण्याकडून दिले जाते. तरी या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत. परतु जुलै २०२० च्या लागणसाठी शेतीच्या मशागत व बेण्यासाठी दरवर्षी कांडे बील दिले जाते.

या वेळेस मात्र कारखान्याने कांडे बील काढलेले नाही .’तरी कारखान्याने कांडे बील आणि दिवाळीच्या अगोदर दिले जाणारा ऍडव्हान्स आपण एकत्र दयावेत ही नम्र विनंती. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने या विरोधात तीव्र आदोलन छेडण्यात येईल. याच्या होणाऱ्या परिणामाची आपण व कारखाना व्यवस्थापन जबाबदार राहतील याची आपण गंभीर दखल घ्यावी या आशयाचे निवेदन आज देण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा