प्रसिद्ध चित्रकार यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून केली कोरोना विषयी जनजागृतीचे

10

सोलापूर, १४ जुलै २०२० : सोलापूरतून अनेक कलावंत निर्माण झाले आहेत सोलापूरात कलावंतांची मांदियाळी आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा या सोलापूरमधील एक कलावंत सचिन खरात
यांनी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांमध्ये जनजागृती करणे आपल्या कलेचा वापर केला आहे.

प्रशासनाने वारंवार सांगून देखील नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करत नसल्यामुळे आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून जनजागृतीचे काम हाती घेतल्याचे पहावयास मिळाले.

त्यांनी सात रस्ता इथल्या प्रमुख चौकात सचिन स्वतः बनवलेले एक कासव ज्याच्या तोंडाला मास्क लावला आहे तसेच विविध पेंटिंग बनवून मास्क लावण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांमधून चांगलेच स्वागत होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा