गोल पोस्ट राष्ट्रीय अर्थमंत्री करणार पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा

अर्थमंत्री करणार पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा

नवी दिल्ली, दि.१५ मे २०२० : सध्या कोरोनामुळे सर्व देश लॉकडाऊनमुळे ठप्प झाला आहे. उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यात केंद्र सरकारकडून उद्योगांना चालना देण्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पॅकेजचा तिसऱ्या टप्प्याची घोषणा आज (शुक्रवारी) सायंकाळी ४ चार वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण करणार आहेत.

या पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना समाजातील शेवटच्या टप्प्यातील घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा दावा अर्थमंत्र्यांनी मागच्या बैठकीत केला होता.

गुरुवार ( दि.१४) रोजी झालेल्या दुसर्‍या पत्रकार परिषदेत त्यांनी स्थलांतरित कामगार, पथ विक्रेते, छोटे व्यापारी आणि छोटे शेतकरी याबद्दल घोषणा केली होती. ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात येणार आहे. तसेच परप्रांतीय कामगारांना पुढील दोन महिने मोफत धान्य मिळणार असून कार्ड नसलेल्यांना पाच किलो रेशन देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली होती. त्यामुळे आज सर्वसामान्यांसाठी अर्थमंत्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version