न्यूज अनकट विशेष: ममोता देवी या पहिल्या भारतीय महिला आहेत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉडी बिल्डिंग मध्ये पदके मिळवली आहेत. भारतामध्ये या क्षेत्रामध्ये फार कमी महिला आपले करियर करताना दिसतात. समाजामधून महिलांसाठी या क्षेत्रामध्ये फारसे प्रोत्साहन मिळत नाही काहीवेळा टिकांना ही सामोरे जावे लागते. ममोता देवी या अशा महिलांसाठी प्रेरणा आहेत ज्यांना बॉडीबिल्डिंग हे महिलांसाठी नाही असे वाटते. ममोता देवी आणि त्यांचे पती हे एकमेव जोडपे आहे ज्यांनी भारतासाठी महिला व पुरुष गटामध्ये एशियन टायटल विजेतेपद मिळवले आहे.
ममोता देवी यांचे बोरून यांच्याशी लग्न झाले आहे व त्यांना तीन मुलेही आहेत. ममोता देवी यांचे पती बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहेत व त्यांनी मिस्टर इंडिया व मिस्टर एशिया यांसारखे नावाजलेले किताब आपल्या नावे केले आहे. बोरून यांनी सहावेळा मिस्टर एशिया किताब आपल्या नावे केला आहे. लोकांकडून या दाम्पत्यावर टीका केली जायची की, लग्नानंतर बॉडी बिल्डिंग करणे अशक्य आहे; परंतु बोरून यांना जेव्हा दुसरे मिस्टर एशिया किताब मिळाले होते तेव्हा यांना दोन मुले होती. ममोता यांनी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये २०१५ साली सुवर्णपदक पटकावले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांनी एशिया बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले होते.
ममोता देवी या १९९५ च्या काळात मॉडेलिंगच्या क्षेत्रात होत्या मॉडेलिंग व रॅम्पवॉक हे त्यांचे क्षेत्र होते. जेव्हा त्यांचे बोरून यांच्याशी लग्न झाले त्यानंतर त्यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रांमध्ये येण्याचे ठरवले. हे करत असताना त्यांच्यावर समाजातून अनेक टीका करण्यात आल्या. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले. लग्न झाल्यानंतर दोन मुले झाल्यावर त्यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात येण्याचे ठरवले. अवघ्या काही वर्षात त्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवण्या पर्यंत झेप घेतली. ज्या क्षेत्राचा त्यांनी कधी आयुष्यात विचारही केला नव्हता त्या क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये ही गगन भरारी घेतली आहे. हे भारतीय स्त्रियांसाठी एक प्रेरणादायक आहे.
बॉडीबिल्डिंग करण्याआधी त्या मॉडेलिंग क्षेत्रांमध्ये असल्यामुळे त्यांना मेकअप करणे व सुंदर दिसणे या गोष्टींमध्ये खूप आवड होती; परंतु बॉडी बिल्डिंग मध्ये आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यामध्ये व शरीर बांधा यात बदल होत गेला. नंतरच्या काळामध्ये त्यांचा चेहरा पुरुषांच्या चेहरा सारखा दिसू लागला. अनेक जण त्यांना हिनवण्यासाठी “कैसे हो भाई साहब” किंवा “सर”रअसे उद्गार करत असे. त्यांच्या शरीरामध्ये पूर्ण बदल झाल्यामुळे त्यांनी मेकअप करणे सोडून दिले. बॉडी बिल्डिंग क्षेत्रांमध्ये गगन भरारी घेण्यासाठी यांनी यांसारख्या अनेक गोष्टींचा सामना केला आहे. बॉडी बिल्डिंग क्षेत्र हे फक्त पुरुषां पुरते मर्यादित नसून यामध्ये महिलाही तेवढ्याच प्रभावी ठरू शकतात हे त्यांनी जगाला दाखवून दिले. समाजामध्ये जरी काही लोक त्यांना वेगळी वागणूक देत असले तरी त्या म्हणतात की, भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यात मला गर्व आहे व भारताचा ध्वज आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवण्यात माझा सहभाग आहे याबद्दल मला नेहमीच अभिमान वाटत राहील.
१० मार्च २००९ साली त्यांनी स्वतःची जिम सुरू केली. हे करता करता त्यांनी भारतासाठी आज पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ पदके मिळवली आहेत. आजूबाजूला नकारात्मक लोकं जरी त्यांचे मानसिक खच्चीकरण करत असले तरी या सर्वांवर मात करत आज त्या भारतातील बॉडी बिल्डिंग क्षेत्रांमध्ये एक आयकॉन म्हणून बघितल्या जातात.