प्लाझ्मा थेरेपी झालेल्या पहिल्या रुग्णाचा मुंबईत मृत्यू

मुंबई, दि. १ मे २०२०: मुंबई येथील लिलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपी केलेल्या पहिल्या रुग्णाचा गुरुवारी ( दि.३०) रोजी रात्री मृत्यू झाला आहे.अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

प्लाझ्मा थेरेपी केलेला हा पहिला रुग्ण असल्याचेही बोलले जात आहे. या ५२ वर्षीय रुग्णावर हा प्रयोग करण्यात आला होता.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचाराचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र काही तासांनी त्याचा अखेर मृत्यू झाला.

या व्यक्तीला ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने २० एप्रिलला वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.या चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं.

मात्र नंतर रुग्णालयाने पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती. त्याचा जीव वाचविण्यासाठी पालिकेने प्लाझ्मा थेरेपी देण्यास मंजूरी दिली. त्यानुसार त्याच्यावर शनिवारी ( दि.२५) रोजी नायर रुग्णालयात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना लिलावती रुग्णालयात ठेवण्यात आले मात्र त्याचा थेरेपी नंतर मृत्यू झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा