पुणे, १८ ऑगस्ट २०२३ : भारताचा टी-२० क्रिकेट संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील भारत आणि आयर्लंड हा पहिला सामना आज शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी द व्हिलेज स्टेडियम, डबलीन येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी २:०० आणि IST संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
विशेष म्हणजे, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच वेगवान गोलंदाज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेतून भारतीय क्रिकेटचा सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानापासून लांब होता.
भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिकेसाठी, दोन्ही देशांनी त्यांच्या संघांची घोषणा खूप आधी केली आहे. या मालिकेत आयर्लंडचे नेतृत्व पॉल स्टर्लिंग करणार आहे.
आयर्लंड टी-२० संघ: पॉल स्टर्लिंग कॅप्टन, अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वूरकॉम, बेन व्हाइट, क्रेग यंग.
भारताचा टी-२० संघ: जसप्रीत बुमराह (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड