इंदापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

इंदापूर, दि.३०एप्रिल २०२०: इंदापूर तालुक्यात कोरोनाने पहिला बळी घेतला असून भिगवण येथील एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी उपचारा दरम्यान या जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मंगळवार (दि.२८) रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भिगवण स्टेशन परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. या महिलेच्या रुपाने कोरोनाने इंदापूर तालूक्यात आपले खाते उघडले आहे. एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र आज (दि.२९) सकाळी साधारणत: दहाचे सुमारास उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने एक प्रकारे त्या महिलेची झुंज अपयशी ठरली आहे.

मात्र असे असले तरी या महिलेवर भिगवण परिसरात ज्या डॉक्टरांनी उपचार केले होते तो डॉक्टर व एका लॅबोरेटरी मधील पॅथोलॉजिस्टचा ही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे एक प्रकारचा दिलासा यातून मिळालेला आहे. मात्र अद्यापही उर्वरित सहा नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी असल्याने थोडी चिंता आहे.

तर दुसरी बाब म्हणजे त्या कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील तिचा मुलगा,सुन व दोन नातवंडे यांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण अठ्ठावीस नागरिकांपैकी चोवीस जणांचे स्वैब आरोग्य विभागाने घेतले होते. व यापैकी अठरा व्यक्तींची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. तर स्वैब घेतलेल्या सहा नागरिकांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा