मुंबई, दि. १७ मे २०२०: राज्यात उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक काढून चौथे लॉक डाऊन घोषित केले आहे. पंजाब पाठोपाठ आता महाराष्ट्राने देखील केंद्रातून आदेश येण्याच्या आत आपले लॉक डाऊन घोषित केले आहे. आज लॉक डाऊन चा शेवटचा दिवस होता त्यामुळे आज तिसरे लॉक डाऊन संपणार होते. उद्यापासून चौथे लॉक डाऊन राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत.
चौथ्या लॉकडाउन चा कालावधी हा १८ मे पासून ते ३१ मे पर्यंत राहणार आहे. २४ मार्च पासून देशात पहिले लॉक डाऊन गोसित करण्यात आले होते. त्यानंतर आज लॉक डाऊन चा ५३ वा दिवस चालू आहे. अद्याप केंद्र सरकार कडून देशातील चौथ्या लॉक डाऊन ची घोषणा केली गेलेली नाही. ती घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून आज दिवसा अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे.
या लॉक डाऊन मध्ये कंटेनमेंट झोन आणि रेड झोन यांच्यासाठी कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. खास करून पुणे, मुंबई सारखी हॉटस्पॉट शहरांमध्ये याचे कडक पालन करण्यात येणार आहे. अद्याप उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही सूचना मिळालेला नाहीत. या चौथ्या लॉक डाउन काळामध्ये उद्योगधंद्यांसाठी नवीन नियम काय असतील, तसेच सर्वात जास्त महसूल मिळणारे क्षेत्र म्हणजे मद्यविक्री या विषयी सरकारचे धोरण काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्थलांतरित मजुरां विषयी देखील अद्याप कोणते निर्णय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले नाही. रेड झोन आणि कंटेनमेंट भागासाठी नवीन नियम काय असतील याबाबत देखील स्पष्टता अजून समोर आलेली नाही. आज दिवसाखेर किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री या गोष्टींविषयी स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी
खूप छान आहे