पुरंदर १३ फेब्रुवारी २०२१: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा देव संस्थानच्या वतीने उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आज जेजुरी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये रिमोटचे बटन दाबून पवार यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याचे काल पहाटे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नियोजित कार्यक्रमा अगोदरच अनावर करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या. शरद पवार या कार्यक्रमाला येतात की, नाही याबाबत सुद्धा अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले, यशवंतराजे होळकर, राज्यमंत्री दत्ता भरणे, आ.संजय जगताप, आ.रोहित पवार,जी.प.अध्यक्ष विश्वास देवकाते, जेजुरीच्या नगर अध्यक्ष विना सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक टेकवडे, देव संस्थांनचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, माजी अध्यक्ष संदीप जगताप, शिवराज झगडे, राजकुमार लोढा. याच बरोब देव संस्थानचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे