पुणे ८ ऑक्टोबर २०२०: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कला व सॅनिटायजर खूप महत्व आले आहे.मात्र बाजारात मास्कचा तुटवडा होत असल्याने मास्कच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे.
कोरोना संसर्गाने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना कोरोना पासून वाचण्यासाठी लागणाऱ्या मास्क व सॅनिटायजरच्या किमती वाढल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या समितीने अहवाल राज्यासासनाला आज सादर केला आहे.त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या किफायतशीर किमतीत मास्क मिळणार आहे.असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.एन ९५ सारखे दर्जेदार मास्क १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी व तिहेरी पदारांचे मास्क हे तीन ते चार रुपयांना मिळणार आहे.समितिने निर्धारित केलेल्या किमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.शासन मान्यतेनंतर सुधारित दरात मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे.अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव