मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या भेटवस्तू चा दोन महिन्यांत लिलाव

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२२: शिवसेनेचे कट्टर नेते असणारे एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांना भेटवस्तू म्हणून विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या भेट वस्तूचा दोन महिन्यांत लिलाव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या भेटवस्तूचा लिलाव करण्यात येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वर्षभराच्या काळात त्यांना दिलेल्या भेटवस्तूचा लिलाव केला जातो आणि ती रक्कम नमामी गंगा प्रकल्पासाठी दिली जाते. पंतप्रधान मोदी यांच्या भेटवस्तू लिलावामध्ये एकूण १२०० वस्तू आहेत. यामध्ये सीएम शिंदे यांनी दिलेल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीचा ही समावेश आहे. भेटवस्तूचा लिलाव हा दिल्लीतील मॉर्डन आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे. या वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या मूर्तीसाठी बोली ची सुरु करण्याची किंमत दहा हजार आठशे रुपये ठेवण्यात आली.

राज्यातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ८ आणि ९ जुलै रोजी यांनी दिल्लीचा दौरा केला होता. दरम्यान त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा असे सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांना यावेळी सर्व नेत्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही भेट वस्तू म्हणून दिली होती. आता पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या मूर्तीचा अवघ्या दोन महिन्यांमध्ये लिहिला होणारा आहे. त्याशिवाय ७ मार्च रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीचाही लिलाव मध्ये सामावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा