बुधवार पासून सासवड मार्केटयार्डच्या धान्य बाजारतील लिलाव होणार सुरु

पुरंदर, दि.३१ जुलै २०२०: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नीरा कृषी उत्पन्न समितीचा सासवड येथील धान्य बाजारतील धान्य लिलाव बंद ठेवण्यात आला होता . मात्र सध्या सासवडमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने व्यापारपेठ सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजार सुरू करण्याचा निर्णय समितीच्यावतीने घेण्यात आला आहे.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेला सासवड येथील धन्य बाजार येत्या बुधवार दिनांक ५ ऑगस्ट पासून पूर्ववत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी दिली आहे.

बाजार सुरू होत असल्याने बाजार समितीतील संपूर्ण आवारामध्ये औषध फवारणी करण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांनी बाजारात आल्यावर सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, तोंडाला मास्क वापरावे. त्याचबरोबर आपला धान्य माल बुधवारपासून बाजारात आणावा व ग्राहकांनी देखील नियमांचे पालन करीत धान्य खरेदी करावे असे आव्हान सभापती मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहेे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू होत असलेल्या या धान्य बाजारामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा