उस्मानाबाद, १९ ऑक्टोबर २०२०: मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झालेले आहे. नैसर्गिक हानी मुळे जास्त नुकसान झाले ते शेतकऱ्याचे. पिके वाहून गेली. सगळा माल उध्वस्त झाला. शासकीय प्रतिनिधी समोर येऊन झालेल्या नुकसानीची सर्वत्र पाहणी करत आहेत ; परंतु पीक वाहून गेल्याचे दुख शेतकरी सहन करू शकत नाही.
तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावातील श्री. भारत गोंडगीरे या शेतकऱ्याने नदी काठच्या त्याच्या दीड एकर रानात द्राक्षाची बाग लावली होते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये, त्याची संपूर्ण बाग वाहून गेली आणि खाली शिल्लक राहिला तो फक्त अँगलचा सांगाडा. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील पाहणी देखील केली. शेतकऱ्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. तसेच, शासन आहे मदतीला आपण नक्की काही मार्ग काढू असे म्हणत आश्वासन देखील दिले. पण, रात्रंदिवस केलेली मेहनत अशी वाहून गेल्यावर डोळ्यातले अश्रू थांबणे कठीण.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड