कोल्हापूर, २६ जून २०२० : मागील तीन महिन्यांपासून कोरोना वायरस मुळे सर्वत्र संचारबंदी लागू करून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता.
यामध्ये सर्व बाजारपेठा, कंपन्या, शैक्षणिक संस्थान तसेच देशातील सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे देखील बंद करण्यात आली होती . मात्र मंदिरातील दैनंदिन पुजा अर्चा मात्र केली जात होती. १ जून पासून काही राज्यांमध्ये सरकारने ठरवून दिलेल्या नियम व अटीं नुसार भक्तांना मंदीरात दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मंदिरे भाविकांसाठी उघडून पुजा अर्चना करून दर्शनाचा लाभ भाविक घेत आहेत. परंतू महाराष्ट्रात अजूनही काही मंदिरात भाविकांना प्रवेश नाही, परंतू मंदिर व्यवस्थापन मंदिरात होणा-या पुजा अर्चांचे फोटो सोशल मिडिया वर टाकून भक्तांना देवाच्या दर्शनाचा लाभ देत आहेत.
असेच काही कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचे गाभा-यातील दिवे बंद करून दिव्यांच्या प्रकाशात काढलेले देवीचे अप्रतिम फोटो सध्या सोशल मिडियावर आपणास पाहण्यास मिळत आहेत. कोरोना वायरसच्या भीतीमुळे मंदिरात जावून दर्शन घेता येत नसले तरी असे फोटो बघून भाविक प्रसन्न होत असून आपल्या करवीर निवासिनीला या कोरोनाच्या संकटातून मुक्त करण्याचे साकडे घालत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी