देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांच्या पणतूंनी दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा

चेन्नई, २३ फेब्रुवारी २०२३ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. सीआर केसवन यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिलेल्या राजीनामा पत्रात केसवन यांनी लिहिलेय की, गेल्या दोन दशकांपासून मी पक्षासाठी काम करत आहे. परंतु, मला कायमच दुर्लक्षित करण्यात आले आणि म्हणुनच मी राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या कार्यक्रमाची कोणतीही जबाबदारी घेतली नाही किंवा भारत जोडो यात्रेतही भाग घेतला नाही.

पुढे ते म्हणाले, मात्र, आता नव्या वाटेवर जाण्याची वेळ आली आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे केशवन यांनी स्पष्ट केले. तसेच केशवन यांनी तामिळनाडू काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांकडेही आपला राजीनामा पाठवला आहे.

केशवन यांनी सध्या इतर कोणत्याही पक्षात प्रवेश नाकारला आहे. आगामी काळात मी काय करणार याची मला स्वतःलाच काही कल्पना नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, सीआर केसवन यांनी २००१ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच त्यांनी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेचे उपाध्यक्षपदही भूषवले. दरम्यान, केशवन यांनी सोनिया गांधी यांना धन्यावाद दिले असून, आपले आजोबा सी राजगोपालाचारी यांच्याप्रती देखील आभार व्यक्त केले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा