किराणा दुकानात होते दारूची विक्री

7

बारामती, दि. २२ जुलै २०२०: बारामती शहरातील तांदुळवाडी येथील किराणा दुकानात दारू विक्री करणाऱ्यावर बारामती तालुका पोलिसानी कारवाई केली असता किराणा दुकानात देशी व विदेशी दारूचा ५० हजार ६८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी सतीश विष्णू लोंढे या दुकांनदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदूळवाडी गावातील निर्मळवस्ती येथे सतीश विष्णू लोंढे (रा. तांदुळवाडी) हा त्याच्या स्वामी समर्थ किराणा दुकानांमध्ये अवैद्यरीत्या देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. लोंढे याच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला असता देशी-विदेशी  ५० हजार ६८ रुपयांचा दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून किराणा दुकांनदारावर दारूबंदी कायदासह अवैद्य रित्या दारू विक्री करत असल्याचा गुन्हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पो.हवा.सुरेश भोई, तानाजी गावडे,पो.ना. रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लाळगे, शरद गावडे, पो.कॉ. श्रीकांत गोसावी, मपोना लता हिंगणे, जयश्री गवळी हे कारवाई मध्ये सहभागी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा