एसबीआय एटीइम म्हणून पैसे काढण्यास आजपासून लागू झाला ‘हा’ नियम

5

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२०: शुक्रवारपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांना बँकेच्या एटीएममधून कोणत्याही वेळी १०,००० रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आवश्यक असेल. एटीएममधून व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बँकेनं हे पाऊल उचललं आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल आणि तुम्हाला बँकेच्या एटीएममधून १०,००० पेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर तुमचा मोबाईल तुमच्या बरोबर घेण्यास विसरू नका, अन्यथा तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. बँकेच्या या उपक्रमास सायबर तज्ज्ञांनी सुरक्षित बँकिंगच्या दृष्टीकोनातून उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल म्हटलं आहे.

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँकेनं १ जानेवारी २०२० रोजी रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्रविष्ट करणं आवश्यक केलं होते.

स्टेट बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कोणत्याही वेळी पैसे काढण्यासाठी ही ओटीपी आधारित सुविधा राबवून बँकेनं एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या सुरक्षेस आणखी बळकटी दिलीय. रात्री बरोबरच आता दिवसा देखील व्यवहारासाठी ओटीपी बंधनकारक करण्याच्या आदेशामुळं एसबीआय डेबिट कार्डधारकांची फसवणूकीची शक्यता कमी झालीय. तसच ही सुविधा अनधिकृत पैसे काढणं आणि कार्ड क्लोनिंग रोखण्यास मदत करल.

कसं काम करते ही प्रणाली

ओटीपी हा सिस्टमद्वारे उत्पन्न केलेला कोड आहे. हे एक-वेळच्या व्यवहारासाठी वापरले जाते. बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, जेव्हा ग्राहक एसबीआय एटीएममधून १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढतो तेव्हा त्याला एटीएम मशीनमध्ये त्याच्या नोंदणीकृत क्रमांकावरील ओटीपी द्यावा लागेल. ही सुविधा फक्त एसबीआय एटीएमवर उपलब्ध आहे.

एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस शेट्टी म्हणाले, तंत्रज्ञानात सुधारणा करून आणि सुरक्षा पातळी आणखी मजबूत करून ग्राहकांना अधिकाधिक सुविधा आणि सुरक्षा प्रदान करण्यात एसबीआय नेहमीच आघाडीवर आहे. आमचा विश्वास आहे की एटीएममधून पैसे काढण्यासाठी २४ x ७ ओटीपी-आधारित प्रणालीमुळं एसबीआय ग्राहकांचा पैसे काढण्याचा अनुभव सुरक्षित आणि जोखीममुक्त होईल. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा